पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब आडवा आणि जिरवा– कर्नल शशिकांत दळवी
पुणे (केशव नवले) : एका बाजूला जगाला सुजलाम-सुफलाम दिसणारा पुणे जिल्हा तर दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची वन वन! अशी अवस्था आहे. ही अवस्था टाळायची असेल तर रेन हार्वेस्टिंग करून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये जिरवला पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा पाहिजे. असे विचार कर्नल शशिकांत दळवी यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चार गावांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प तपासणी आणि पाहणी करताना क्लायमेट रियालिटी चे सदस्य यांच्यासोबत चर्चा करतांना कर्नल शशिकांत दळवी आणि मॅप्स इंडियाचे संचालक अनिरुद्ध तोडकर बोलत होते.
आंबेगाव च्या तहसीलदार रमा जोशी, जयसिंग धुमाळ आणि आय सी आय सी आय मुंबईचे जोआचीम यांनी पुणे जिल्ह्यातील चार गावांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे, या अधिकाऱ्यांची भेट घेऊन क्लायमेट रियालिटी चे सदस्य त्यांच्यासोबत चर्चा करणार असेही दळवी म्हणाले. शशिकांत दळवी आणि मॅप्स इंडियाचे संचालक तोडकर यांनी प्राथमिक चर्चा केली.
प्रथम त्यांना भावाडी गावात पूर्ण झालेल्या प्रकल्प संदर्भात माहिती देऊन प्रकल्प दाखवला. त्यानंतर त्यांनी कुरवंडी व ठगाव या गावांना भेट दिली. जिथे काम सुरू आहे. त्या ठिकाणचे अनुभवही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कामाचे कौतुकही संबंधित पाहाणी साठी आलेल्या अधिकारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी केले.
यावेळी सर्वांच्या सोबत तांत्रिक तपशीलावर चर्चा केली. या कामाची पाहणी आणि भेटी च्या दरम्यान गावचे सरपंच पोलिस पाटील गोरक्षनाथ नवले आणि वसुंधरा संवर्धन पुणे येथील कार्यकर्ते केशव नवले यांच्याशी या अधिकाऱ्यांनी सुसंवाद साधला. आंबेगाव च्या तहसीलदार श्रीमती रमा जोशी यांनी या प्रकल्पाच्या कामात रस दाखवून या परिसरातील ग्रामीण भागात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात निर्माण होणारे संकट यातून मुक्तता मिळावी, यासाठी रेन हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या उत्साहाने रेन हार्वेस्टिंग प्रकल्पात सहभागी होण्याचे आश्वासन देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही या भागात कार्य करून दाखवतो, असे आश्वासन दिले.त्यामुळे या कामाला गती मिळेल असा विश्वास पाहणीसाठी आलेल्या अधिकार्यांनी बोलुन दाखवला.