केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी.!

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी.!

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार,तसेच रा.काँ.चे लातूर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम पाटील व , लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सय्यद मुस्तफा (वकील) इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनसाठी स्वातंत्र लसीकरण मोहिम राबवावी यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,च्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, युवक जिल्हा सरचिटणीस रवी कुमार तुपकर, शहर उपाध्यक्ष अशोक सोनकांबळे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पवार,जिल्हा सरचिटणीस महेश मोरे, विद्यार्थी अहमदपुर तालुकाध्यक्ष विनायक शिंदे पाटील, शहराध्यक्ष आकाश भालेराव, शहर उपाध्यक्ष यशवंत काकनाटे, राजेश जगळपुरे, खंडू पवार, संतोष पवार, उद्धव पवार, शेख फेरोज, पंढरी जोहरे, अतुल पाटील . आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author