अ‍ॅड. गौरी चाटे यांचा सत्कार संपन्‍न

अ‍ॅड. गौरी चाटे यांचा सत्कार संपन्‍न

अहमदपूर (गोविंद काळे) : अ‍ॅड. गौरी सुहास चाटे यांनी बी. एस.सी. एल.एल.बी. (विधी पदवीका) परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्‍त असे की, येथील भाग्य नगर अहमदपूर रहीवाशी असलेल्या तसेच या परिसरातील सर्वपरिचित असलेले दिवंगत अ‍ॅड. भगवानराव चाटे यांच्या नात अ‍ॅड. गौरी चाटे यांनी लातुर येथुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत दयानंद विधी महाविद्यालयातुन शिक्षण पुर्ण केले. त्यांनतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. लातुर येथील वृध्दाश्रमासही सेवा देण्यासाठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अ‍ॅड गोवा चे एल. एल. बी. पास झाल्यानंतरचे रजिस्ट्रेशन झाले असुन नुकत्याच त्या अहदमदपूर येथील दिवाणी तथा जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅड. सुहास चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रॅक्टीस सुरु केली आहे. त्याबद्दल राणी महाजन, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, प्रा. बालाजी कारामुंगीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्‍तर देताना अ‍ॅड. गौरी चाटे म्हणाल्या की, मी संपादन केलेल्या विधी ज्ञानाचा उपयोग गरीब, पीडित, दलित, उपेक्षितांसाठी करणार आहे. माझे आजोबा स्वर्गीय अ‍ॅड. भगवानराव चाटे यांचे आदर्श समोर ठेवुन मी माझ्या विधी क्षेत्रात पाऊल टाकला आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तसेच त्यांच्या प्रेरणेने जे कांही चांगले आहे ते करण्याचा अविरत प्रयत्न करणार आहे असेही त्या आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या.

यावेळी आपलीे मनोगत व्यक्‍त करीत असताना प्रा. मारोती बुद्रूक पाटील म्हणाले की, आज गौरीपुजनाचा जागर सबंध भारतामध्ये होत आहे. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी अ‍ॅड. गौरी सुहास चाटे यांचा सत्कार होणे म्हणजे खुप चांगला योगायोग आहे. अ‍ॅड. गौरी चाटे यांनी आपल्या जीवनात गरीबांसाठी, गरजुसांठी कार्य करत राहावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज उद्धारासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करावा असेही ते म्हणाले. यावेळी रुक्मीणी सुहास चाटे, अ‍ॅड. सुहास भगवानराव चाटे, गोविंद सुहास चाटे, राणी महाजन, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, प्रा. बालाजी कारामुंगीकर, राजेश्री कारामुंगीकर, ओम रितेश पटेकर आदींची उपस्थिती होती.

About The Author