महेश अर्बन को.ऑप. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

महेश अर्बन को.ऑप. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : महेश अर्बन को. ऑप. बँक लि. अहमदपूर जि.लातूर यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झूम अँप द्वारे ऑनलाइन पद्धतीने पार पडली. ही सभा माजी मंत्री, महेश अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब जाधवसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून सभेस मार्गदर्शन केले.

यावेळी महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, संचालक तथा सभापती शिवानंद हेंगणे, संचालक आशिष गुणाले, संचालक मुजीब पटेल, संचालक दिलीपजी जाधव, संचालक ऍड.विनायकराव भोसले, संचालक सतीश कल्याणे, संचालक अशोक गादेवार, संचालक दिगंबर भताने, संचालीका सौ.सत्यवतीताई  कलमे, संचालीका सौ.संगीताताई खंडागळे, तज्ञ संचालक ऍड.भारतभूषण क्षीरसागर, व्यस्थापकीय संचालक विनायक भोसले, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र जाधव, व्यवस्थापकीय संचालक पुंडलिक मेकले, व्यवस्थापक शेख सादिक, प्रभारी व्यवस्थापक पी.पी. मांडवकर, सहव्यवस्थापक एस.एस.रंदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author