केंद्रीय मंत्री भगवंतजी खुब्बा यांचा अहमदपूर व चाकुर तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

केंद्रीय मंत्री भगवंतजी खुब्बा यांचा अहमदपूर व चाकुर तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : बिदर लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगवंतजी खुब्बा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री नुकतीच वर्णी लागल्याने त्यांचा अहमदपूर व चाकुर तालुक्याच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी उदगिर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री भगवंतजी खुब्बा यांची एका शिष्टमंडळाद्वारे उदगिर येथे भेट घेऊन विकास कामाविषयी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आमदार सुधाकर भालेराव हे उपस्थित होते. उदगिर येथील साईधाम मंगल कार्यालयात केंद्रीय मंत्री भगवंतजी खुब्बा यांचा भव्य सत्कार अहमदपूर व चाकुर तालुक्याच्या वतीने करतेवेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, चंद्रशेखर पाटील, सभापती प्रशांत पाटील, मेघराज बाहेती, हणमंत देवकते, सिध्देश्वर पवार , कमलाकर पाटील, शिवराज पाटील, अमित रेड्डी, निळकंठ पाटील, रामभाऊ बेल्लाळे, गोविंद गिरी, किशोर कोरे, निखिल कासनाळे, रुशिकेश बोंडगें,कपिल मुरूडकर, बालाजी काळे,संगम कुमदळे, विष्णु पौळ आदिसह अहमदपूर व चाकुर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author