मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी कायम कटिबद्ध आहे – आ. बाबासाहेब पाटील

मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी कायम कटिबद्ध आहे - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : मतदारसंघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याशी फोन द्वारे आमदार बाबासाहेब पाटील यांनी संवाद साधला. लवकरात लवकर अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत पंचनामे करून घ्यावेत अशी विनंती केली. तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून याबाबतच्या सूचना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचल्या आहेत. मंत्री महोदयांनी लवकरात लवकर याबाबत कार्यवाही व्हावी याबाबत सूचित केले. तसेच या अतिवृष्टी बाबत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी मी कटिबद्ध आहे असे यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगीतले.

About The Author

error: Content is protected !!