महेश नागरी सहकारी पतसंस्था ची वार्षिक सर्वसाधारण ३४ वी सभा संपन्न
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरूर ताजबंद ची वार्षिक सर्वसाधरण ३४ वी सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला अध्यक्ष या नात्याने आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.पत संस्थेचे उद्दिष्ट,ध्येयधोरणे यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केले. याप्रसंगी महेश पतसंस्थेचे चेअरमन तथा जि.प.गटनेते मंचकरावजी पाटील साहेब, व्हॉइस चेअरमन सैदापुरे बाबूरावजी, संचालक ऍड.टी.एन. कांबळे, संचालक पी.एल. मिटकर, संचालक शिवानंद भुरे, दिपकराव भराटे, राजू चव्हाण, चेअरमन दिलीप वळसे, शाखा व्यवस्थापक मोहन खेडकर, शाखा व्यवस्थापक सीसोदे, शाखा व्यवस्थापक संतोष सूर्यवंशी, व्यंकट हजारे, टाळे साहेब, मौला शेख, युवराज शिंदे, कर्मचारी आदी उपस्थित होते.