शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच द्वारा शहीद भगतसिंग जयंती उत्साहात संपन्न

शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच द्वारा शहीद भगतसिंग जयंती उत्साहात संपन्न

यवतमाळ (राम जाधव) : क्रांतीकारकांचे मेरूमनी शहीद भगतसिंग यांची जयंती शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच, यवतमाळ यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. मंचच्या सर्व सदस्यांनी हुतात्मा चौक परिसरात श्रमदान करून आगड्या वेगळ्या पद्धतीने शहिदांना अभिवादन केले. यानंतर भगतसिंग समजून घेताना या विषयावर खुली सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. तर सायंकाळच्या सत्रात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक प्रमोद कांबळे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्रविण देशमुख हे होते. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना प्रविण देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य ईतिहास कथन केला, विद्यार्थ्यांनी भगतसिंग याचां आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, भगतसिंग यांचे वाचन जसे अफाट होते तसेच वाचन करून प्रयत्नप्रामान्यवादी जीवण जगले पाहिजे. समाजाचे आपन काही देणे लागतो याचे स्मरण कायम असावे असे प्रतिपादन केले, तर प्रमुख अतिथी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सार्वजनीक स्वच्छता राखणे ही देखिल देशभक्ती असून तरुणांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा अपेक्षा व्यक्त करतांनाच हुतात्मा चौक परिसराचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यानंतर सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन आणि पारितोषिक वितरण मुख्याधिकारी सौ.माधुरी मडावी व प्रमोद कांबळे यांच्याहस्ते RACC कृषी संस्था, यवतमाळ येथे झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदारज ठाकरे, उदय सरताबे, प्रद्युमन जवळेकर, पंढरी पाठे, सचिन मनवर, गोकुल खडसे यांनी प्रयत्न केले.

About The Author