अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी – आ. बाबासाहेब पाटील
मा. पुनर्वसन मंत्री महोदयांकडे पत्राद्वारे मागणी केली.
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार साहेब यांच्याकडे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे केली.
अहमदपुर विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये माहे सप्टेंबर 2021 मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे व दि.27/09/2021 रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सोयाबिन या पिकाची पेरणी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यांत पिक काढण्यास आलेले असताना अतिवृष्टीमुळे सोयाबिनच्या शेंगास मोड आलेले आहे. सध्यस्थितीत सदरील पिक हे मागील 10 दिवसापासून पाण्यातच आहे. तसेच कापसाचे सतत पडणाऱ्या पावासामुळे नुकसान झालेलेल आहे. अहमदपूर तालुक्यात आजपर्यंत 970.16 मि.मी. पाऊस व चाकूर तालुक्यात 875.00 मि.मी. पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. तरी जिल्हा कृषी अधिकारी तहसिलदार व विमा कंपनी यांना त्वरीत सुचना देवून सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळणे बाबत कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी केली.