केळगाव येथे शिवसेना शाखेची स्थापना
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील मौजे. केळगाव येथे शिवसेनेची शाखा शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे,संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व्यंकटराव पांचाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, सुनील नाईकवाडे, हुजूर मुजावर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. शाखाप्रमुख म्हणून जोहर पांढरे, उपशाखाप्रमुखपदी रमेश गवारे, सचिवपदी अमर गवारे, संघटकपदी मोहब्बत दाळिंबकर, ज्ञानोबा चव्हाण तर कोषाध्यक्षपदी कल्लाप्पा मिटकरी व सदस्य म्हणून मोसिन पांढरे, विलास गवारे, वामन काळे, भीम काळे, ईश्वर गवारे इत्यादीची नियुक्ती करण्यात आली. शेतमजूर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या व गोरगरीब शेतमजुराच्या प्रश्नाला आम्ही धावून येऊ असे मत शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे यांनी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश रेशमे यांनी केले तर सूत्रसंचालन शेख अहेमद यांनी केले.