पंचनाम्याचे नाटक न करता शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार मदत द्या – लक्ष्मण फुलारी
उदगीर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, ढगफुटी आणि तळ्यातून अचानक नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे न करता सरकारने सरसकट नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या सर्वच पिकासाठी हेक्टरी 50 हजार आणि ऊस पिकासाठी व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांचे आर्थिक मदत नुकसान भरपाई म्हणून द्यावी. अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांचा खछळ चालू आहे. सुरुवातीला पावसाने दिल्यात ताडणमुळे सोयाबीन करपून जात होते. त्यानंतर लगेच अतिवृष्टी झाल्याने आणि ढगफुटीमुळे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन सह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांचे उसाचे पीक आडवे झाले आहे. जलाशय तुडुंब भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले, यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांचे पशुधन ही पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शासनाने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पंचनाम्याचे नाटक न करतात सरसकट आर्थिक मदत हेक्टरी पन्नास हजाराची जाहीर करावी. अशी आग्रही मागणीही सदरील निवेदनात लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी केली आहे.