सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दगडू पाटील यांना गुणगौरव पुरस्कार प्रदान

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दगडू पाटील यांना गुणगौरव पुरस्कार प्रदान

लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समिती च्या वतीने दिला जाणारा 2019- 20 चा तालुका स्तरीय गुणगौरव पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद शिक्षक दगडू पाटील यांना प्रदान करण्यात आला.

लातूर तालुक्यातील नांदगाव या गावचे सुपुत्र दगडू पाटील हे गेली अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात आपली सेवा बजावत आहेत. ते सध्या ढाकणी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून त्यांनी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील असतात त्या अनुषंगाने त्यांना 2019- 20 या वर्षाचा तालुका स्तरीय गुणगौरव पुरस्कार लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख लातूर पंचायत समितीच्या सभापती सरस्वती पाटील, उपसभापती मुन्ना उपाडे, आबासाहेब पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, पंचायत समिती सदस्य राम चामे, धनराज पाटील व तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बदल त्यांच्या वर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्कार नांदगावकरांना समर्पित – दगडू पाटील

मला मिळालेल्या गुणगौरव पुरस्काराचे खरे मानकरी हे नांदगावकर आहेत. मला गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेम व आशीर्वाद मुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. म्हणून हा पुरस्कार मी नांदगावकरांना समर्पित करतो असे वक्तव्य जिल्हा परिषद शिक्षक दगडू पाटील यांनी रोहित पाटील मित्र मंडळाच्या वतीने नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले.

यावेळी चेअरमन सतिश कुलकर्णी, व्हाईस चेअरमन व्यंकट घोडके, कैलास जगताप, पवन साळुंके, संतोष साळुंके, धीरज पाटील, सिदाजी जगताप, कमलाकर वाघमारे, सतिश ढमाले, भागवत पाटील, विश्वनाथ पाटील, विलास पाटील, नंदकुमार पाटील, रणजित पाटील, हरिभाऊ घोडके, सिदाजी जगताप, श्रीपाल वाघमारे, शरीर शेख, प्रभाकर शेकडे, गोविंद चिगुरे, सुयश जगताप, किर्तीमान जगताप, सुधाकर पाटील, त्रिंबक पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author