शैक्षणिक क्षेत्रा सोबतच सामाजिक प्रश्न सोडवणार – बालिका मुळे

शैक्षणिक क्षेत्रा सोबतच सामाजिक प्रश्न सोडवणार - बालिका मुळे

उदगीर (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना सोबत संस्थाचालकांचेही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोबतच आपण सामाजिक प्रश्नाला देखील संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडू, असे विचार श्रीमती बालिका मुळे यांनी व्यक्त केले.

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी उदगीर येथील उपक्रमशील शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या बालिका मुळे यांची निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालिका लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या सत्कार समारंभाच्या प्रसंगी लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रितीताई चंद्रशेखर भोसले, उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे या उपस्थित होत्या.

 पुढे बोलताना बालिका मुळे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव आणि सर्वांना सोबत घेऊन  कार्य गेल्या वीस वर्षापासून आपण करत आहोत. तोच वसा कायम ठेवत गोरगरीबांच्या सेवेसाठी आणि समाज सेवेसाठी आपण वेळ देत आहोत, देणार आहोत असे स्पष्ट केले.तसेच सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रामेश्वर बिरादार जकळाणकर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!