डॉ. गोविंद  सोनकांबळे यांचा सत्कार व सन्मान  

 डॉ. गोविंद  सोनकांबळे यांचा सत्कार व सन्मान  

उदगीर (प्रतिनिधी) : डॉ.गोविंद सोनकांबळे यांचा उदगीर समता सैनिक दलाच्या वतीने नुकताच सेवा दंत रुग्णालय उदगीर  येथे सत्कार व सन्मान केला.    

     डॉ. गोविंद सोनकांबळे यांची उदगीर डॉक्टर असोसिएशन अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे. त्यानिमित्ताने बौद्धमहासभा उदगीर, समता सैनिक दलाच्या वतीने  उदगीर संरक्षण विभाग प्रमुख कमलाकर सांगवीकर व त्यांच्या मित्र परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन, त्यांच्या रुग्णालयात सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी  जितेंद्र शिंदे, संस्थापक मनोहरमामा कांबळे, एस. डी. कांबळे, भीमसेन कांबळे, संग्राम रावणगावकर, चंद्रकांत सूर्यवंशी, यशोदीप सूर्यवंशी, वैजनाथ कांबळे, संगीता सूर्यवंशी, पत्रकार अंबादास अल्लमखाने हे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!