स्त्रियांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन
उदगीर (प्रतिनिधी) : “आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, इनरव्हील क्लब उदगीर व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्याय हा सर्वांसाठी कायदेविषयक जनजागृती’ व ‘स्त्रीविषयक कायदे संबंधित मार्गदर्शन’ या विषयानुसंगाने जनजागृती अभियान राबविण्यात आले
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सौ विद्या सुपेकर ( न्यायाधीश उदगीर) यांची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील ,डॉ उषा काळे (डेप्युटी सुप्रिडेन्ट) , अँड. प्रा. नावंदर, व इनरव्हील अध्यक्षा मीरा चेंबुले ,सचिव शिल्पा बंडे ,सहसचिव अँड. नीलिमा पारसेवार यांची विशेष उपस्थिती होती
न्या.सौ विद्या सुपेकर यांनी स्त्रियांच्या कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले ,तसेच इनरव्हिल क्लब उदगीरच्या सहसचिव अँड नीलिमा पारसेवार यांनी राज्यघटनेत नमूद असलेल्या कायद्यांची थोडक्यात पण महत्त्वाची अशी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी जवळपास 100 महिलांची उपस्थिती होती, या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेंबर्स, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालया चा सर्व स्टाफ, व इनरव्हील क्लब उदगीरचे मेम्बर्स उपस्थित होते.