पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार- बाळासाहेब पाटोदे
उदगीर (एल.पी. उगिले) : भारतीय जनता पक्षाने आपल्यावर विश्वास टाकून युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड करून सन्मान दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करून पक्षाची विचारधारा, विकासाचे नियोजन उदगीर तालुक्यातील घराघरापर्यंत पोहचवण्याचे कार्य आपण करू, असे उद्गार नवनिर्वाचित युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अहमदपूरचे नेते दिलीपरावजी देशमुख मालक यांच्या वतीने युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब पाटोदे त्यांचा सत्कार करून गौरव केला. सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब पाटोदे बोलत होते.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुदर्शन माने, सरपंच संग्राम अण्णा भालेराव, तालुका सरचिटणीस माधव टेपाले, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गवारे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष धनराज बिरादार, श्री पटवारी, शिवशंकर धुप्पे,आनंद भोसले, अक्षय घोरपडे, विशाल गायकवाड, संतोष भालेराव, लकी पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
पुढे बोलताना बाळासाहेब पाटोदे यांनी स्पष्ट केले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने विकासाचा आखलेला आराखडा नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य युवाशक्तीला हाताशी धरून आपण करून घेऊ. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी राबवू. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्या विश्वासाने पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी सोपवली आहे, त्याचे गांभीर्य विचारात घेऊन पक्ष संघटनेतील कोणत्याही नेत्याला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही चुकीचे कार्य माझ्या हातून कदापि होणार नाही. अशीही ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.