प्रमोद बन यांची हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड

प्रमोद बन यांची हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड

लातूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद बन यांची निवड करण्यात आली आहे.

लातूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीत संस्थापक कृष्णदेव गिरी यांच्या सूचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात असणारा जन संपर्क पाहता प्रमोद बन यांची लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीस बी.एम.गिरी, प्रा.प्रदीप भारती, प्रा.नागेश गिरी, बळवंत पुरी, महेश पुरी, मनोज पुरी, नानासाहेब गिरी, सदाशिव गिरी, माधव गोसावी, विश्वजित गिरी, संजय गिरी, जयराम बन, देवगीर गिरी, गोविंद बन यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती होते. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author