नगरसेविका रागिणी यादव कचरा विलगीकरण चषक स्पर्धा
लातूर (प्रतिनिधी) : आपल्या घरात जमा होणाऱ्या दैनंदिन कचऱ्याचे नियोजन महानगरपालिका करतच असते,मात्र जो कचरा आपण दररोज जमा करून सकाळी घंटागाडीला देतो,त्यात कसलेही नियोजन नसल्याचे अनेकदा आढळून येते. त्यासाठी प्रभाग 11 हा याला अपवाद ठरावा यादृष्टीने कचऱ्याचे योग्य नियोजन अर्थात ओला कचरा व सुखा कचरा व इतर कचरा वेगवेगळा करून देणाऱ्या घरांची स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर यादरम्यान घेण्याची घोषणा आज करण्यात येते आहे. जो परिवार या स्पर्धेत प्रथम येईल त्याला, प्रथम पारितोषिक-सोन्याची नथ, द्वतिय पारितोषिक- पैठणी, तॄतीय पारितोषिक-चांदिचे नाणे, उत्तेजनाथॆ – दोन पारितोषक असे पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे. शहर महानगरपालिकेच्या मार्फत या स्पर्धेचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेच्या कालावधी दरम्यान प्रत्येक घराचा दररोज आढावा घेण्यात येईल. आणि नंतर मनपा सहाय्यक आयुक्त सौ. मनिषा गुरमे, क्षेत्रिय अधिकारी कलिम शेख, एस. आय. सुपेकर, सुपरवायझर बालाजी राऊत हे या स्पर्धेतील विजेत्यांचे नंबर काढतील. प्रभाग 11 मधिल सगळ्या परिवारानी या स्पर्धेत भाग घेऊन स्वच्छ लातुर व सुंदर लातुर या संकल्पनेत सहभागी होऊन आदर्श परिवाराचे उदाहरण लातुरकरासमोर ठेवावे.या स्पर्धेचे पारितोषिक संपुर्ण परिवाराला बोलावून त्यांचा सन्मान केला जाईल.