तंत्रज्ञानामुळे मानवी जिवनात पुढील दहा वर्षाच्या काळात अमुलाग्र बदल होतील – राहुल दाभाडे
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील अॅनिमेशन विभागाने ‘वेब डेव्हलपमेंट मधील प्रगत तंत्रज्ञान आणि वेब डिझाईन मधील करिअर च्या संधी’ या विषयावर एक दिवसीय सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड प्रमुख वक्ते राहुल दाभाडे अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा. दुर्गा शर्मा, प्रा.इरफान शेख, प्रा.सचिन पतंगे इत्यादी उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतामध्ये तंत्रज्ञान व मानवी मुल्य यांची सांगड मानवी जिवन अधिक प्रगतीशील व अधिक उंचीवर नेण्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन प्राचार्य.डॉ. एस.पी.गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दुर्गा शर्मा यांनी केले. वेब डिझाईनर कडे कलात्मक गुण व तांत्रिक गोष्टींची जान असायलाच हवी तेंव्हाच तो यशस्वी होतो.असे मत त्यांनी मांडले.
कुठलाही व्यवसाय मग तो छोटा असो किंवा मोठा असो अधिका अधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बदलत्या काळात ऑनलाईन मार्केटिंग अतिशय प्रभावी माध्यम आहे. आज ग्राहक ही तंत्रज्ञानामुळे प्रगत झाला असल्याने कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तो ऑनलाईन त्यांची किंमत, त्याची गुणवत्ता तसेच उपलब्धता या सर्व बाबी तपासून पाहतो. यासाठी या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात लोगो, वेबसाईट, ब्लॉग, इत्यादी बाबींचा वापर व्यवसायाच्या प्रगतीसाठी केल्यास अधिक फायदा होईल व वेबसाइट डिझाईनींग मध्ये करिअर करणा-या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केदार करपे तसेच पाहुण्यांचा परीचय मनस्वी इंगळे हिने तर सर्व मान्यवरांचे आभार सागर गुंडाळे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्त्र कर्मचारी इ.परीश्रम घेतले.