भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देशातही खळबळ माजली आहे. कोव्हिडच्या धोकादायक तिसऱ्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी अहमदपूर येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये ग्रामीण रुग्णालय अहमदपूर मार्फत मोफत लसीकरण अभियान भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतिने ठेवण्यात आली होती.भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या सामाजिक कार्यकृते व अहमदपूर तालूका रुग्ण कल्याण समिती सदस्य मुजम्मिल सय्यद यांच्या नियोजनामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये पहिल्याच लसीकरण मोहीमेस २९० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला मुजम्मिल सय्यद यांच्या नियोजनात सुरु असलेल्या लसीकरणास अहमदपूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. हेमंत पाटील, जिल्हा नियोजन सदस्य चंद्रकांत मद्दे, शहराध्यक्ष विकास महाजन, अक्षय देशमुख ,प्रकाश ससाणे, यांनी भेट देवून पाहणी केली. लसीकरणास आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. लसीकरण सुरळीत असल्याचे पाहून त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आणि गर्दीच्या ठिकाणी योग्य पध्दतीने मास्कचा वापर करावे दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर आदिंचे पालन देखील न चुकता करण्याची आवश्यकता असुन. विनाकारण गर्दी करणे, गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ फिरणे, आदि प्रकारही सर्वांनी टाळावे असेही आवाहन राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने करण्यात आले.