ॲड.दिपक सुळ यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : समाजातील गरीब, गरजू, दिव्यांग, दुर्धर आजाराने पिडीताच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेची सुरूवात केली आहे. ही योजना गरीब माणसासाठी उपयुक्त ठरली आहे. या अनुदान योजनेस पात्र असलेल्या लातूर शहरातील सर्वां पर्यंत ही योजना पोहचली पाहिजे, अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. लातूर शहरात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक प्रभागात संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विक्रम नगर या ठिकाणी असलेल्या श्रावस्ती बौध्द विहार येथे संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या समाधान शिबीरात प्रारंभी प्रभागातील नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच या लाभार्थीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मदत करण्यात आली. या शिबीरास नागरीकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, संजय गांधी निराधार कमिटीचे चेअरमन हकीम शेख, डॉ. बालाजी साळुंखे, बबन देशमुख, महादेव बरूरे, मनोज देशमुख यांनी या योजने संदर्भात माहिती दिली.
यावेळी नगरसेविका उर्मिला बरुरे, नगरसेवक विकास वाघमारे, रवि निवळकर, प्रवीण कांबळे, अनंद वैरागे, मनोज देशमुख, कुणाल येळीकर, कार्यालयीन प्रभाग समन्वयक अभिजीत तोंडकर यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, निराधार महिला, पुरुष प्रभागातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल सुर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार पवन सोलंकर यांनी मानले.
