सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय किसान दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा ता अहमदपूर येथे आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शेतामध्ये घेऊन जाऊन शेतकरी जोडप्याचे स्वागत संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याला शेती विषयक माहिती देताना कुलदीप हाके म्हणाले देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस म्हणजे 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. रानात दिवासभर राबतो तोच आहे खरा राजा, रानात सोनं पिकवतो शेतकरी माझा अशा शब्दात सर्व शेतकरी बांधवांना कुलदीप हाके यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संचालिका शिवालीका हाके, प्राचार्य रुत चक्रनारायण, शुभांगी सूर्यवंशी, माल्कनी निजमुद्दिन, नवाल सय्यद, वैजनाथ धुळगुंडे केशव तोंडारे, रवी नरवटे व सर्व विद्यार्थ्यांनी शिवार फेरी करून शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन शेतकरी दिवस साजरा केला.