संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात 22 डिसेंबर 2021 बुधवार रोजी राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. गणित दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळ्या ,गणितीय चित्रे, गणितीय कोडे,गणिताची सूत्रे सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तर प्रमुख पाहुणे श्री सुरेश वट्टमवार सर, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सर सह शाळेतील सर्व सहशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गणितीय कोडे विचारली व त्यांची उत्तरे स्वीकारली यावेळी प्रमुख पाहुणे श्री वट्टमवार एस .एस , कवडे सर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा कसा आहे याबाबत सखोल मार्गदर्शन केले व गणिताबद्दलची विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणिताचे अध्यापन करणाऱ्या सविता पाटील व ज्ञानेश्वर चव्हाण या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रावणी वट्टमवार या विद्यार्थिनीचा वाढदिवसही शाळेला गुलाबाची पाच रोपं देऊन साजरा करण्यात आला. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार संजीवनी गुरमे यांनी मानले. गणितीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!