केंद्रेवाडीचे सुपुत्र श्री नागनाथ शिवहार केंद्रे यांचा LIC मध्ये पदार्पणातच रचला इतिहास
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी चे सुपुत्र श्री नागनाथ केंद्रे यांनी अहमदपूर LIC ऑफीसमध्ये इतिहास रचला आहे 1990 साली अहमदपूर येथे LIC शाखा स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही LIC विमा प्रतिनिधींना 32 वर्षात अमेरिकेतील संस्थेकडून दिला जाणारा MDRT हा बहुमानाचा पुरस्कार कुणालाही प्राप्त झाला नव्हता परंतु ही किमया शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उच्चशिक्षित असलेल्या LIC ग्रामीण प्रतिनिधी असलेल्या श्री नागनाथ शिवहार केंद्रे यांनी साधली आहे त्यांनी आपल्या पहिल्याच वर्षीत LIC प्रतिनिधी होऊन अहमदपूर शाखेमध्ये नियुक्त झाले व त्यांनी पहिल्याच वर्षी अमेरिकेच्या संस्थेकडून दिला जाणारा MDRT पुरस्कार पटकावला ते अहमदपूर शाखेतील पहिल्याच वर्षी MDRT होणारे प्रतिनिधी ठरले आहेत. त्यांनी 32 वर्षात कुणालाही हा विक्रम करता आला नव्हता तो यांनी केला आहे यावेळी त्यांनी हे काम करण्यासाठी मला आई वडील मा . सभापती सौ . अयोध्याताई अशोकराव केंद्रे जि.प. सदस्य श्री अशोक काका केंद्रे माझे सर्व विमा ग्राहक सदस्य D.O. श्री मोहिम कादरी सर व महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक सामाजिक कार्यकर्ते श्री माधव केंद्रे यांनी मोलाचे योगदान दिले असे सांगितले यावेळी शाखाप्रमुख श्री रत्नपारखी साहेब उपशाखा प्रबंधक श्री कानगुलकर साहेब D.O.श्री मोहिब कादरी सर श्री वलसे साहेब श्री जोशी साहेब श्री वानखेडे साहेब सर्व एलआयसी कर्मचारी समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.