विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजुर हिंदू दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा संपन्न

विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजुर हिंदू दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजुर प्रखंड दिनदर्शिका 2022. प्रकाशित करण्यात आली. यावेळी माजी आमदार मा.बब्रुवानजी खंदाडे, दिलीपरावजी देशमुख, राजकुमार मजगे, यांच्या हस्ते व नगरसेवक संदीप चौधरी, रवी महाजन व तसेच ad किशोर कोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला .

विश्व हिंदू परिषद या कॅलेंडरच्या माध्यमातून घराघरांमध्ये संस्कार पसरवण्याचे जे कार्य करत आहे त्याबद्दल मा. दिलीपराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे कॊतुक केले तर मा. खंदाडे साहेबांनी कार्यकर्त्यांचे या संस्कार पूर्ण उपक्रमासाठी आभार मानले. या प्रकाशन सोहळ्यात मातृ शक्तीने सहभाग दर्शवून या उपक्रमाला आपले आशीर्वाद दिले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रखंड मंत्री रवी कच्छवे यांनी केले तर आभार जिल्हा सहसंयोजक मधुकर धडे यांनी मानले.

या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रांत पदाधिकारी नंदकुमार कोनले, मधुकर धडे, विनोद भुतडा, रवी कच्छवे, गजानन चंदेवाड, नरेश यादव, सुदर्शन रेड्डी, गजानन मेनकुदळे, गणेश भदाडे, विलास बयास, गणेश हालसे, श्रीकांत केंद्रे, सागर सातपुते, अक्षय कदम, हेमंत शिंदे, गोपाळ हिवरे, अविनाश चापकानडे, गिरीश यादव, अक्षय कंधारकर आदि स्वयंसेवक उपस्थित होते . हा सोहळा संत चुडामणी महाराज यांच्या साक्षीने चुडामणी महाराज मंदिरात संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!