रेणापूर तालुका काँग्रेस च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

रेणापूर तालुका काँग्रेस च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

रेणापूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने दि. ३ जानेवारी २०२२ रोजी भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँक चे व्हाईस चेअरमन ॲड. प्रमोद आबा जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड.प्रमोद आबा जाधव, निराधार कमिटीचे अध्यक्ष गोविंद पाटील, शहराध्यक्ष मतिन अली शेख, सेवादलाचे तालुका अध्यक्ष हणमंत पवार, इंदुबाई इगे, महिला तालुका अध्यक्ष पुजा इगे, नगरसेवक पदम पाटील, नगरसेवक अनिल पवार, नगरसेवक भुषण पनुरे, अजय चक्रे, सचिन इगे, प्रदिप काळे तसेच विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!