श्यामलाल हायस्कूलमध्ये सावित्री उत्सव आरोग्य व्यवस्थापन व कायदे विषयक संरक्षण कार्यक्रम संपन्न !
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी शालेय विद्यार्थिनी साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य व्यवस्थापन शिबिर व कायदेविषयक संरक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ऍड. कप्पीकेरे पूजा मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती धनश्री जाधव यांनी केले व त्यांनी वाढत्या वयातील मुलींच्या शरीरात होणारे बदल या विषयी मार्गदर्शन केले व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता व आरोग्यदायी सवयी, व्यायाम आणि आहार याच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी ऍड. कप्पीकेरे पूजा मॅडम यांनी मुलींच्या संदर्भातील कायदे विषयक जाणीव जागृती, मुलींचे संरक्षण या संदर्भामध्ये सखोल मार्गदर्शन केले. वाढत्या वयातील मुलींनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये निर्भयपणे जगण्याचा मार्ग स्वीकारावा., सामाजिक जीवनामध्ये जगताना विनाकारण आपणास इतरांकडून त्रास,छळ होत असेल तर लगेच त्यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रार करावी.कायदा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कोणताही अन्याय अत्याचार आपल्यावर होणार नाही यासाठी निर्भयपणे आपण त्यासंदर्भात बोलले पाहिजे, कोणत्याही समस्या लपवून न ठेवता उघडपणे त्यावर मार्ग काढता आला पाहिजे त्यासाठी मनमोकळेपणाने आपण संवाद साधला पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात माननीय मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी शालेय विद्यार्थिनींनी कोणताही संकोच न बाळगता आपणास जर कोणताही त्रास होत असेल तर त्यासंबंधी आपले माता पालक व शाळेतील शिक्षिका यांच्याशी नेहमी संवाद साधावा, आरोग्यविषयक व कायदेविषयक माहिती आपणास अशा विशेष कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न शाळा नेहमी करत असते त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार धनश्री जाधव मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.