दयानंद कला महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटावरील विद्यार्थ्यांचे लसिकरण

दयानंद कला महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटावरील विद्यार्थ्यांचे लसिकरण

लातूर (प्रतिनिधी) : कोविड -१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी १८ वर्षावरील नागरिकांना लसिकरणाची मोहिम मोठ्या उत्साहाने देशात राबविण्यात येत आहे. पाहता पाहता १५० कोटीचा टप्पा आपल्या देशाने ओलांडला आहे. ओमिक्रॉनचे सावट वाढत असतानाच १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी, कोवॅक्सीनचे लसिकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. पहिल्याच दिवशी या लसिकरणाचा लाभ २२३ विद्यार्थ्यांनी घेतला.

या लसिकरण मोहिमेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रमेश बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोषाध्यक्ष संजय बोरा, संचालक विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, सौ स्मिता विशाल अग्रवाल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॅा.कोरे अंजली, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संदिप जगदाळे, डॉ.गोपाल बाहेती, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. सुरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. कु.तणिष्का विशाल अग्रवाल इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीला लस देऊन लसिकरणाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. लातूर महानगरपालिका, वॅक्सीन ऑन व्हिल व दयानंद कला महविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने ही लसिकरण मोहिम राबवण्यात आली.

यावेळी महानगरपालिकेचे ऋषिकेश पाटील, सुवर्णा सूर्यवंशी, निकिता इजगज, रोहिनी हनमंते, विद्या सुर्यवंशी, गोकर्णा गिरी, मनिषा कदम, आरती ढवारे, अनुसया खाडे, संजिवनी गायकवाड,निर्गुणा जानकर, सना शेख व वॅक्सीन ऑन व्हिलचे प्रोजेक्ट समन्वयक आशिष स्वामी आदि कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. लसिकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक भरत पवार, ऐश्वर्या पाटील, आधीराज जगदाळे, तनुजा फड, साक्षी सगर, अनमोल कांबळे, अनंत खलूले आदींनी परिश्रम घेतले.

About The Author