ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मुक्कावार मॅडम, श्री भोळे सर, लिमये सर,देबडवार सर तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण विषयक कार्याची माहिती प्रभावीपणे कु लाला रक्षिता,नामवाड संस्कृती, मानसी जाधव, रागिनी ढगे विद्यार्थ्यांनी भाषणांमधून सर्वांना दिली.,
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थिनी वैष्णवी चंदे, जान्हवी बिरादार,श्रुती देवणे,रागिनी दहिफळे,बलुले वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व शिक्षण विषयक कार्याची माहिती श्री भोळे सर,श्रीमती मंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर भाषेत दिली.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी क्रांतीज्योती, शिक्षणाची गंगोत्री, पहिल्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणाचा वसा अविरतपणे यापुढेही चालू ठेवूया, समाजातील कोणीही निरक्षर राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू., असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोडगे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.