राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

About The Author