सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका – डॉ शरदकुमार तेलगाणे

सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका - डॉ शरदकुमार तेलगाणे

उदगीर (एल. पी.उगिले) : सध्या वातावरणात बदल होत आहे. गारठा पडला आहे. अशा परिस्थितीत सामान्यतः सर्दी, खोकला, ताप यायला सुरुवात होते. मात्र याच काळात कोरोना चा ओमिक्रोन हा व्हेरीयंट देखील गतीने पसरत आहे. त्यामुळे ताप कोणताही असो, अंगावर काढू नका. आपल्या फॅमिली डॉक्टरला लगेच दाखवून औषध उपचार घ्या. कोरोना च्या डेल्टा असेल किंवा ओमिक्रोन असेल त्या संदर्भात कोणतीही हलगर्जीपणा करू नका, किंवा त्याला सहज घेऊ नका. कोरोनाला घाबरू नका, मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. येणाऱ्या संकटाला टाळण्यासाठी स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा. सामाजिक आंतर, मास्कचा नियमित वापर, सतत हात धूत राहणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, अत्यावश्यक असेल त्याच वेळेस घराबाहेर पडावे, सॅनिटायझर चा वापर करावा. अशाही सूचना उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा समाज प्रबोधनचे कीर्तनकार ह. भ. प. शरदकुमार तेलगाणे यांनी दिल्या आहेत.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या संपूर्ण जगात ओमिक्रोन मोठ्या गतीने पसरत आहे. जवळपास एकशे पाच देशात त्याचा फैलाव झाला आहे. आपल्या देशातील 23 राज्यात त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्र ही आहेच, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने विशेष काळजी घ्यावी. आणि प्रशासनाला सहकार्य करावे. असेही आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात, विभागात जाऊन जनतेचे प्रबोधन करावे. जेणेकरून जनता दक्ष राहील. जनतेने घाबरून जाऊ नये, परंतु प्रशासनाचे आदेश पाळावेत. काळजी घ्यावी यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी केले आहे.

About The Author