ब्रेल लिपीमुळे अंध विद्यार्थीना नवसंजवनी – डाॅ.रामप्रसाद लखोटीया
उदगीर प्रतिनीधी : ब्रेल लिपीचा उदय झाला अन अंध विद्यार्थ्याना आपल्या जिवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणारी ब्रेल लिपी मुळे त्यांच्या जिवनात एक नवसंजवनी आली.फ्रान्समध्ये 4 जानेवारी 1809 रोजी जन्मलेले लुई ब्रेल यांना लहान वयात झालेल्या अपघाताने त्यांना अंधत्व आले. शिक्षण घेताना त्यांना स्पर्शाने वाचता येईल,अशी कोणतीही लिपी उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्यांना अडचणी येत होती ‘गरज ही शोधाची जननी असते’ या उक्तीप्रमाणे अंध व्यक्तींना स्पर्शाने वाचता येईल,अशी सांकेतिक लिपी विकसित करण्यासाठी ब्रेल यांनी खूप धडपड केली आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी शोधलेल्या लिपीला ‘ब्रेल’ हे नाव देण्यात आले.व ती आज अंध विद्यार्थी यांची काळाची गरज बनली आहे असे डाॅ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नाल उदगीर अरूणा अभय रिसोर्स सेंटर फाॅर ब्लाइड या शाळेत ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरूवात लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व केक कापुन सुरूवात झाली.या कार्यक्रमाला प्रमुख सुरेश देबडवार सहसेक्टरी,प्रा.गुडमेवार,डाॅ.प्रेमदास चव्हाण,लखन कदम,प्रकाश आहेर सुरवसे घोळवे यांची उपस्थीती होती.
पुढे मार्गदर्शन करताना 6 जानेवारी 1852 ला त्यांचे निधन झाले.नंतरच्या काळात या लिपीतही काही बदल झाले.आता त्या लिपीत कितीतरी भाषा लिहिल्या,वाचल्या जातात.भारतातही या लिपीचा वापर करून अंध व्यक्ती साक्षर होतात.
आजही देशात जन्मणाऱ्या एक हजार बालकां पैकी नऊ बालके नेत्रहीन किंवा दृष्टिबाधित असतात.अपघाताने व अन्य कारणांनी येणारे अंधत्व वेगळे! या संख्येवरून समजते
आज अंध व्यक्ती विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करत आहेत. अनेक बॅंकांत व मोठ्या कंपन्यांत जबाबदारीचे काम अंध व्यक्ती स्वावलंबी पणाने करत आहेत.
असे ही ते उपस्थीत अंध विद्यार्थाना संबोधीत केले.यावैळी उपस्थीत एस.एस.पाटील,गणेश मुंडे,रेखा माने,प्रा.भालेराव व विद्यार्थी सामाईक अंतर राखुन उपस्थीत होते.