फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांची चोरी
पुणे (प्रकाश इगवे) : इंग्रजी भाषेत संभाषण करून फॉरनर असल्याचे भासवून हातचलाखी करून दोघांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजारांचा गंडा घातला. याबाबत तुषार चंद्रकांत घुमटकर (रा. समतानगर, माळीमळा, राजगुरूनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात दोघे आले. ते इंग्रजीत बोलत होते. त्यांनी दुकानातून कार्ड रीडर खरेदी करून तीस रुपये रोख दुकानदारास दिले. ते शंभर व दोनशेच्या नोटा घुमटकर दाखवून दोन हजार रुपयांची नोट मागितली. इंग्रजीत बोलत असल्याने ते फॉरेनर असल्याचे फिर्यादीस वाटले. दोन हजारांची नोट नसल्याने त्यांनी विश्वासाने पाचशे रुपयांच्या नोटा असलेले पाकीट दिले असता, त्यांनी पाकिटातील पाचशे रुपयांच्या १२ नोटा दोन हजाराची नोट पाहण्याचा बहाणा करून खाली-वर करून हातचलाखी करून खिशात ठेवून बाकीच्या नोटा गल्ल्यात ठेवायला दिल्या. ४६ हजारांची रक्कम हातोहात हातचलाखी करून लांबवली.