महिलेचा विनयभंग करून दिली जीवे मारण्याची धमकी
पिंपरी (योगिता कोरे) : पाठलाग करून महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर तिच्या घरच्यांना विष घालून मारून टाकण्याची व स्वतः आत्महत्या करण्याची एका व्यक्तीने धमकी दिली. विठ्ठलवाडी, देहूगाव ते थेरगाव येथे २०१९ ते ३ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. बालाजी सुवर्णकार (वय ४५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.