ग्रामसेवकावर प्रशासकीय कार्यवाहीसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सिफारस

ग्रामसेवकावर प्रशासकीय कार्यवाहीसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सिफारस

महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रकानुसार आणी वारंवार वरीष्ठांच्या आदेशाला निष्काळजीपणा करणे पडणार महाग.

औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील ग्रामपंचायत आणी ग्रामसेवक यांचा कारभारामुळे तसेच अनेक प्रकारच्या गैरव्यवहार मुळे ही ग्रामपंचायत सतत चर्चेत असते तसेच अनेक वेळा वरीष्ठांचे आदेश व सुचना येऊन सुध्दा ही ग्रामपंचायत व येथील ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्तव्य करण्यासाठी हलगर्जीपणा करतात तसेच मनमानी कारभार करीत असतात. असाच एका प्रकरणात आज निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांचेवर प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी जिल्हा परीषद लातूर यांचेकडे सिफारस केलेली आहे.
याची सविस्तर माहिती अशी की, येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले अमोल ढोरसिंगे यांनी दिनांक २६/०९/२०१९ रोजी दोन माहीती अधिकार अर्जाच्या माध्यमातून माहीती मागणी केली होती व त्यामध्ये विहीत मुदतीत माहीती दिली नव्हती म्हणुन विस्तार अधिकारी पंचायत समिती निलंगा यांचेकडे प्रथम अपिल दाखल केले पण त्यांच्या आदेशानुसारही संबंधित ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांनी माहीती दिली नाही म्हणुन अर्जदाराने व्दितीय अपिल राज्य माहीती आयोग खंडपीठ संभाजीनगर येथे दाखल केले त्यामधील सुनावणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली आणि त्यामध्ये दिनांक २२/०७/२०२१ रोजी संबंधित ग्रामसेवक यांना तीस दिवसांमध्ये माहिती देण्यासाठी आदेश दिले व त्या आदेशामध्ये संबंधित ग्रामसेवकांनी माहीती अधिकार कलम ७(१) चा भंग केलेला दिसुन येत असल्यामुळे त्यांनी आयोगा समक्ष व्यक्तीश उपस्थित राहुन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आसतानाही ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांनी पुन्हा निष्काळजीपणा करत माहीती देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे.
या सर्व आदेशानंतर अर्जदार अमोल ढोरसिंगे यांनी जिल्हा परीषद लातुर व गटविकास अधिकारी आणी ग्रामसेवक यांना पुन्हा अर्ज दिला व माहिती देण्यासाठी विनंती केली त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) जिल्हा परीषद लातूर यांनी दि.०२/०७/२०२१ रोजी सरपंच/ग्रामसेवक यांना माहीती देण्यासाठी आदेश दिले व गटविकास अधिकारी यांनीही दि.२७/०८/२०२१ रोजी ग्रामसेवक धनासुरे यांना आदेश दिले पण नेहमीप्रमाणे ग्रामसेवक धनाजी धनासुरे हे बेफिकीर पणे निष्काळजीपणा करीतच राहीले व वरीष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राहीले त्यामुळे त्या कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी आज अखेर दोन वर्षानंतर गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे शिफारस केल्यामुळे अर्जदार अमोल ढोरसिंगे यांनी समाधान व्यक्त केले तात्काळ कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.या अगोदरही यांना बऱ्याच प्रकरणात शासकीय कसूर झाला आहे परंतु ते या गोष्टींना जुमानत नाहीत यासाठी त्यांना निलंबित करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

About The Author