वाहन चोरट्यांचे “धूम मचाले”; शहरातून सहा दुचाकी पळविल्या
पिंपरी (प्रकाश इगवे) : शहरात वाहन चोरटे सुसाट असून, सहा दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी, देहूरोड, भोसरी, एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी शुक्रवारी (दि. ७) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. “भावना किशोर मदनानी (वय ३५, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.
“माऊली सोपान कदम (वय २८, रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी रशिद महमद काझी (वय ५९, रा. महात्मा फुले चौक, काझीवाडा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची दुचाकी चाकण गावच्या हद्दीत बिडवस्ती येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेअकरा ते शुक्रवारी (दि. ७) सकाळी सात या कालावधीत घडला.
मंगळवारी (दि. ४) जाधव वस्ती, रावेत येथील पदपथावरून चोरट्यांनी चोरून नेली. शुभांगी संजय परदेशी (वय २९, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला. राजेश नंदा कुमार (वय २५, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी गुरुवारी त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. देविदास मारुती पडवळ (वय ४८, रा. बोरदरा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.