तरुणाला कोयत्याने मारहाण

तरुणाला कोयत्याने मारहाण

पिंपरी (योगीता कोरे) : आडनाव साधर्म्यामुळे तरुणांवर टोळक्याने हल्ला केला. यात कोयत्याने मारहाण केल्याने तरुण जखमी झाला. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. रोहन गणपत जोशी (वय २२, रा. दापोडी), असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. क्षितिज कसाळे (रा. पिंपळे गुरव) आणि त्याचे साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

About The Author

error: Content is protected !!