अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

पुणे (प्रकाश इगवे) : अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो काढून शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६२ वर्षाच्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला. विनोद हरीश काळे (खराडी रस्ता, चंदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सुनील मोरे यांनी याप्रकरणात सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, वैद्यकीय अहवाल, जन्माचा दाखला आणि तपास अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. ही घटना ऑगस्ट २०१४ ते जानेवारी २०१६ दरम्यान घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावाच्या आग्रहावरून खडकवासल्याला फिरायला जाताना पीडितेची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिच्या मोबाईलवर संपर्क साधत मैत्री वाढवली.

कॉलेजची फी भरायची असल्याने मुलीने आरोपीकडे पैशांची मदत मागितली. त्याने मित्र मॉडेलिंगसाठी फोटो काढून त्या बदल्यात तुला पैसे देईल असे आमिष तिला दाखविले. त्याने मला डोणजे येथील लॉजवर नेऊन दारू पाजून माझे नग्न फोटो काढले. तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या आईवडिलांसह मित्र-मैत्रिणींना हे फोटो पाठवीन, अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक केले. अत्याचार दोन वर्षे हा प्रकार सुरू होता, त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने हातावर ब्लेडने वार करून जखमी केले असे पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटले.

About The Author