चिठ्ठी लिहून; दहावीत शिकणाऱ्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

चिठ्ठी लिहून; दहावीत शिकणाऱ्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे (प्रकाश इगवे) : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आदी अमित कर्वे (वय १५, रा. काकडे सिटी, कर्वेनगर), असे या मुलाचे नाव आहे. ही घटना काकडे सिटी येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली. वारजे माळवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, त्यातून त्याने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली हे स्पष्ट होऊ शकले नसल्याचे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी, त्याचे आई, वडील व बहीण, असे चौघे जण कर्वेनगरमधील काकडे सिटी येथे राहायला आहेत. त्याचे वडील एका खासगी बँकेत नोकरीला असून, आई शिक्षिका आहे. मोठी बहीण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आदी हा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर गेले होते. आदी हा एकटाच घरात होता. त्याची बहीण सायंकाळी घरी आली. तेव्हा आदी याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आदीच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

About The Author

error: Content is protected !!