सायबर क्राईम! डेटा हॅकची धमकी देत मागितली ११ कोटींची खंडणी

सायबर क्राईम! डेटा हॅकची धमकी देत मागितली ११ कोटींची खंडणी

पुणे (प्रकाश इगवे) : डेटा हॅक करून कंपनीचे नुकसान करण्याची भीती दाखवून डोजे कॉईन या आभासी चलनामध्ये ११ कोटी ६३ लाख रुपयांची एका फायनान्स कंपनीला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कंपनीच्या ३२ वर्षांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी आय टी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानगर परिसरात फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना २८ नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने ई-मेल केला. या कंपनीच्या अधिकाऱ्याकडे ७३ लाख ९५ हजार ३७३ डोजे कॉईन्स (भारतीय चलनानुसार ११ कोटी ६३ लाख रुपयांच्या) खंडणीची मागणी केली. डोजे कॉईन्समध्ये पैसे पाठविले नाहीत तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करून कंपनीचे मोठे नुकसान करण्याची धमकी दिली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

About The Author