बहिणीनेच सख्या बहिणीला १ कोटी ४० लाखाला फसविले

बहिणीनेच सख्या बहिणीला १ कोटी ४० लाखाला फसविले

पुणे (योगिता कोरे) : तेलंगणातील महिलेने पुण्यात फ्लॅट घेतला. त्या ठिकाणी भाडेकरू ठेवण्यासाठी तिने पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला पॉवर ऑफ अॅटर्नी करून फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार दिला. तिने त्याचा वापर करून या फ्लॅटवर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्याच बहिणीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जुली गिरीश अय्यर (वय ४४, रा. हैद्राबाद) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ज्योती राजीव नायर (वय ४७) राजीव नायर (दोघे रा. औंध) आणि रेलिगेर फिनवेस्ट लि. या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.

About The Author

error: Content is protected !!