अंबाजोगाई – लातूर महामार्गावर भीषण अपघात; जागीच ६ जण ठार
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई – लातूर महामार्ग वर दि. 9 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात जागीच ६ जण ठार झाले असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई – लातूर महामार्ग वर असलेल्या बर्दापूर फाट्या जवळील एका वळणावरती बस व ट्रकच्या समोरासमोरील धडकेत भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता एवढी भीषण हाेता की, मृतांची संख्या वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातात जागीच ६ प्रवाशांचा मृत्यू तर ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
