तडीपार गुंडाकडून पोलिसाला जिवे मारण्याची धमकी

तडीपार गुंडाकडून पोलिसाला जिवे मारण्याची धमकी

पिंपरी (प्रकाश इगवे) : शहरात आलेल्या तडीपार गुंडाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी तडीपार गुंडाने पोलिसाची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. पिंपरी भाजी मंडई येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. सचिन शिवाजी सुर्वे (वय ३७, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस हवालदार संपत मच्छिंद्र खाडे यांनी शनिवारी (दि. ८) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुर्वे याला २१ सप्टेंबर, २०२० रोजी दोन वर्षांकरिता पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, त्याने शासनाची किंवा पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला. याबाबतची माहिती मिळाल्यावर, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी पोलीस हवालदार खाडे यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केल.

About The Author

error: Content is protected !!