विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; सासऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी (रफिक शेख) : दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोटाची केस केली, तसेच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे २५ फेब्रुवारी २०११ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी विवाहितेने शनिवारी (दि. ८) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती विवेकानंद प्रभाकर रोकडे, सासरे प्रभाकर किसन रोकडे, दीर प्रमोद प्रभाकर रोकडे, सासू आणि जाऊ (सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
