गणेश हाके यांची भाजपा प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती

गणेश हाके यांची भाजपा प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गणेश दादा हाके पाटील यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीची घोषणा मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. चद्रकांत दादा पाटील यांनी नियुक्तीचे पत्र हाके यांना प्रदान केले. हाके यांची सलग आठव्यांदा प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली असून गेली अठरा वर्षे हाके प्रदेश प्रवक्ते म्हणून भाजपाची, भाजपा सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडत आहेत. संयमी व अभ्यासू प्रवक्ता असा त्यांचा लौकिक असून ते पक्षाच्या मनोगत पाक्षिकाचे गेली 18 वर्षे झाले संपादक आहेत. साहित्य प्रकाशन, प्रकोष्ठ प्रशिक्षण, प्रज्ञा प्रकोष्ठाचे राज्य संयोजक, माध्यमांचे राज्य प्रभारी, जिल्हा प्रभारी, निवडणूक अधिकारी, सदस्य नोंदणी प्रमुख, विधानसभा, लोकसभा प्रचार समिती व जाहीरनामा समितीचे सदस्य या जबाबदाऱ्या हाके यांनी समर्थपणे पार पडल्या आहेत.

यांच्या निवडीमुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या निवडीचे आ. संभाजी पाटील, आ.अभिमन्यु पवार, आ. रमेशआप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, मा. आ. विनायकराव पाटील, मा.दिलीपराव देशमुख, मा. आ. बब्रुवान खंदाडे, मा. आ. सुधाकर भालेराव, मा.अशोककाका केंद्रे, मा.त्र्यंबक गुट्टे, मा.भारत चामे, गुरुनाथ मगे, प्रेरणा होनराव, अमोल निडवदे, हेमंत गुट्टे, वसंत डिगोळे, रेखाताई तरडे, हनुमंत देवकते, दत्ता जमालपुर, प्रताप पाटील, परमेश्वर पाटील, नितीन रेड्डी आदी तसेच सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!