शिक्षणातून सामाजिक संहिष्णुता निर्माण झाली पाहिजे – प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे

शिक्षणातून सामाजिक संहिष्णुता निर्माण झाली पाहिजे - प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे

अहमदपूर (गोविंद काळे) : जर विश्वात विश्वबंधुत्व निर्माण करायचे असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. विश्वबंधुत्वाची शिकवण सामाजिक शास्त्रातून मिळते अशा शिक्षणातूनच सामाजिक संहिष्णुंता निर्माण होते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सद्स्य तथा कर्मवीर तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळतीचे प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे यांनी केले. डॉ.गंगथडे हे येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास मंडळ उद्धाटन व भित्ती पत्रक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य तथा कर्मवीर तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळतीचे प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे हे उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो.डॉ. अनिल मुंढे , डॉ. प्रशांत बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती व संयोजक डॉ. सतीश ससाणे , डॉ. बी. के. मोरे , डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रकाश चौकटे ,डॉ. सचिन गर्जे, डॉ. डी.एन.माने यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे म्हणाले की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आदी सामाजिकशास्त्रांचा परस्पर संबंध आहे. कारण या सामाजिकशास्त्रांचा केंद्रबिंदू मानव आहे, म्हणून मानवाची संस्कृती व त्यांच्या सामाजिक जीवनाची माहिती मिळवून जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिकशास्त्रांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी अर्थशास्त्र विभागाच्या गीता दोडे, इतिहासविभागाच्या संजना ससाणे, राज्यशास्त्र विभागाच्या शालू जाधव, समाजशास्त्र विभागाच्या नूरजहाँ पठाण तसेच भूगोल विभागाच्या जुफिशा नाजनीन या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाच्या ‘अर्थस्पंदन ‘ आर्थिक साक्षरता विशेषांक, राज्यशास्त्र विभागाच्या ‘ जनताराज ‘ कृषी विधेयक विशेषांक, इतिहास विभागाच्या ‘ संस्कृती ‘ या राजमाता जिजाऊ विशेषांक, भूगोल विभागाच्या ‘वसुंधरा ‘ व समाजशास्त्र विभागाच्या ‘ संस्कार ‘ या सिंधुताई सपकाळ विशेषांक’ भित्तीपत्रकांचे प्रकाशन तसेच संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांच्या ‘प.पु. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे गीता योगदान ‘ या समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘पांडुरंग शास्त्री आठवलेंचे गीता योगदान’ या ग्रंथाचे लेखक डॉ. प्रशांत बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले तर या ग्रंथावर प्रसिद्ध समीक्षक तथा ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी सविस्तर विवेचनात्मक ,सटीप भाष्य केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सामाजिकशास्त्रांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे.देश काल आणि वातावरण तसेच मानवी जीवन व संस्कृतीचे शास्त्रीय पध्दतीचे ज्ञान सामाजिकशास्त्रात मिळते. तसेच सामाजिक शास्त्रे ही समाजातील विविध घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.असे ही ते यावेळी म्हणाले. प्रारंभी प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के. मोरे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.पी. चौकटे यांनी करून दिला. तसेच सूत्रसंचलन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतिश ससाणे यांनी केले; तर आभार भूगोल विभागाचे डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी ‘कोविड -१९’ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author