माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन
अहमदपुर (गोविंद काळे) : शहरातील प्रभाग क्रं 5 मधील कुमठा काॅलणी मधील सिमेंट रोड, नाली बांधकाम, हायमस्ट पोल आदि विकास कामांचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदपूर नगर परिषदेच्या विविध योजने अंतर्गत रस्ते तसेच खासदार निधीतून सिमेंट रोड साठी निधी मंजूर करून घेतला होता त्याचे उद्घाटन माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, रिपाइंचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, बाबुराव कोडगिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी राजकुमार खंदाडे, सुर्यकांत जाधव, मधुकर लाडके, डॉ.वैभव आकरुपे, गोविंद गुळवे, धनंजय बोराडे,केशव मुंडकर , विनायक हिंगोले, वसंत केंद्रे,राजू मरवले, अतुल रेड्डी, धनंजय तोखले, राजकुमार शिंदे आदिंसह हे प्रभाग पाच मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित रेड्डी यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार गोविंद गिरी यांनी मानले. सदरील कार्यक्रमात दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.