राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबीर

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबीर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दि. 11 जाने रोजी रक्त दान शिबीर व मास्क आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आले आहे.यात 129 बॅगचे रक्त संकलन करण्यात आले या शिबीर साठी लातूर येथील लातूर ब्लड बँक व संजिवणी ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले. या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रसाद कुलकर्णी तालुक्याचे तहसीलदार, यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी ,संदीप चौधरी नगरसेवक यांची उपस्थिती होती

यावेळी जयंती समिती अध्यक्ष विशाल चापटे,उपाध्यक्ष शुभम वर्मा, लक्ष्मण अलगुले,आशिष हेंगणे, स्वप्नील व्हात्ते, अनंत खानपुरे, नागेश हेंगणे, अजय जगताप, अमोल सज्जनशेट्टी, विवेक गादगे,श्याम यादव, रामप्रसाद आय्या, वैजनाथ हेंगणे, माधव महाजन, नागेश सूर्यवंशी, गजानन मेनकुदळे, अजय गादगे, विलास महाजन, वैभव कल्याणकर, कपिल चिवडे, कृष्णा चावरे, राजू लोहकरे, या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

About The Author

error: Content is protected !!