किलबिल स्कॉलरशिप परीक्षेत 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

किलबिल स्कॉलरशिप परीक्षेत 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल येथील इयत्ता 5 वी वर्गातील उत्कर्ष मारोती जाधव व मैथिली नागेश मुसळे तर 8 वी वर्गातील श्रेयस सुधीर मेनकुदळे, मयुरेश माधव कांबळे, चंद्रशेखर एकनाथ भगनूरे, ओमराजे अहेलाजी धुळगुंडे असे एकूण 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत जाधव उत्कर्ष हा विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आला आहे. सदरील सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, शाळेचे प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले, सचिन जगताप, ज्ञानेश्वर जाधव यांनी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!