राज्यस्तरीय संगीत स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरताल संगीत व दयानंद कला महाविद्यालयाचा उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : स्व.पंडित शांताराम चिगरी गुरुजी व स्व. शकुंतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ सुरताल संगीत महाविद्यालय आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय संगीत स्पर्धेस स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्षीरमण लाहोटी व सरचिटणी रमेश बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धत शास्त्रीय गायनात ईश्वरी दुलंगे, सुगम गायन बालगटातून स्वरदा मोहळकर (सोलापूर), सुगम गायन खुल्या गटातून प्राची खोत आणि तबला वादनात भार्गव देशमुख (नांदेड) यांनी प्रथम क्रमांक पटकावत यश संपादान केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात ८ आणि ९ जानेवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत १८ जिल्ह्यांमधून आलेल्या १९० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. याचे उद्घाटन.पं.डॉ राम बोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, यशवंत पाटील, डॉ. अरविंद भातांब्रे इसराज सगर, व प्रमोद भोरेकर उपस्थित होते.
यात शास्त्रीय गायन स्पर्धेत ईश्वरी दुलंगेने प्रथम,
प्राची खोत आणि युगंधरा केचे यांनी द्वितीय, अथर्व वैरागकर, चिन्मय धर्माधिकारी यांनी तृतीय तर भक्ती पाटील, शर्वरी डोंगरे (लातूर) आणि स्वराली जाधव (नगर) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सुगम गायन बाल गट स्पर्धेत स्वरदा मोहळकर (सोलापूर) हीने प्रथम, उन्नती मुंढे द्वितीय, शमीका नाईक तृतीय तर अपुर्वा पाटील आणि भावेश खोसे(पुणे) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. सुगम गायन खुला गटात प्राची खोत प्रथम, भक्ती पवार, मेघापरी साळुंखे द्वितीय, वैशाली अगलावे, वैष्णवी वानखेडे यांनी तृतीय तर कमलाक्षी कुलकर्णी, स्वरांजली पांचाळ, स्नेहा शेवाळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
तबला वादन स्पर्धेत भार्गव देशमुख(नांदेड) प्रथम, पवन शिरामने द्वितीय, समीहन जोशीने तृतीय तर अजींक्य माले व ऋषिकेश यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभास दिशा प्रतिष्ठानचे प्रवर्तक अभिजित देशमुख, प्रा. डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीप जगदाळे, पं. अंगद गायकवाड, इंडियन आयडॉल फेम नंदीनी व अंजली गायकवाड, विनोदवीर बालाजी सुळ, सोनू डगवाले आदी उपस्थित होते.तबला वादन स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवींद्र क्षीरसागर, (पुणे) व शंकर जगताप यांनी केले तर शास्त्रीय गायन व सुगम संगीत स्पर्धेचे परीक्षण अंगद गायकवाड(अहमदनगर) व पल्लवी पोटे (पुणे)यांनी केले.
प्रस्ताविक संयोजक सोनू डगवाले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ संदीपान जगदाळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मीनाक्षी कोळी, संजय सुवर्णकार, अमर कडतने, विजय श्रीमंगले, डॉ राधिका पाठक, डॉ शारदा कोळी, परमेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.